इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक विद्याधर वैद्य यांचे निधन

इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक विद्याधर वैद्य यांचे निधन

पुणे |प्रतिनिधी| Pune

इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक विद्याधर गोविंद वैद्य यांचे वृद्धापकाळामुळे आणि दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. आज (गुरुवार) सकाळी 6.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा अविनाश वैद्य, तुषार वैद्य असा परिवार आहे. अविनाश वैद्य हे नागपूरमध्ये आहेत तर दुसरा मुलगा तुषार वैद्य हे शारजा मध्ये आहेत.

विद्याधर वैद्य यांचा जन्म 22 जानेवारी 1936 मध्ये बुरहानपूर येथे झाले. त्यांचे शिक्षण पर्टवर्धन हायस्कूल आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर येथे झाले. विद्याधर वैद्य हे 1958 मध्ये भारतीय पोलीस सेवेत रुजू होण्यापूर्वी विज्ञान संस्थेत गणिताचे व्यख्याता म्हणून त्यांनी काम पाहिले. 1994 मध्ये 36 वर्षाच्या उत्कृष्ट कार्याकाळानंतर ते इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक पदावरून निवृत्त झाले. वैद्य यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि भारतीय पोलीस पदक मिळाले आहे. तसेच देशातील सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com