नंदुरबार : काल्लेखेतपाड्याची 'बयडी'वाली शाळा पाहिलीत का?
बयडी शाळा , नंदुरबार

नंदुरबार : काल्लेखेतपाड्याची 'बयडी'वाली शाळा पाहिलीत का?

काय आहे ही शाळा, जाणून घ्या सविस्तर

नाशिक | Nashik

होय, शाळा बंद आहेत पण.... शिक्षण नक्कीच चालू आहे..!! नेट, मोबाईल, कॉम्प्युटर, विजेची सुविधा, रस्त्याची सुविधा नसलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील उमराणीच्या काल्लेखेतपाड्यावर..!!

मागील मार्च पासून संपूर्ण देश कोविड-१९ च्या महामारीच्या विळख्यात अडकून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्र म्हणजे मुलांची रोजची वर्दळ, किलबिल, गलागलाट, अभ्यास, नाविण्य, आविष्कार..! पण सध्या सारं काही स्तब्ध असताना सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या काल्लेखेतपाड्याच्या डोंगरात मात्र रोज गुरे राखण्यासाठी जाणारी शाळेची मुलं गुरे जंगलात सोडून एका बिनभिंतीच्या , डोंगरदऱ्यात, नदी नाल्यात भरलेल्या शाळेत मात्र मनसोक्त शिक्षणाचा आनंद लुटत आहेत..!!

कारण शिक्षक आपल्या दरी उपक्रमा अंतर्गत शिक्षक मुलांना आँफलाईन पद्धतीने शिकवत आहेत. पण काही मुलं गुरे चारण्यास जात असल्याने सकाळी गेलेली मुले संध्याकाळ परततात. ही अडचण लक्षातत घेऊन शाळेतील शिक्षकांनी मुले ज्या ठिकाणी गुरे चरण्यासाठी जातात, तेथेच जाऊन शाळा भरवायला सुरूवात केली.

हा उपक्रम राबविणारे शिक्षक म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपेशकुमार नागालगावे होय..! शाळेला सुट्टी असल्याने पाड्यावरील मुलं रोज गुरे राखण्यासाठी जंगलात जातात... त्याला स्थानिक आदिवासी पावरी बोलीभाषेत बयडी म्हणतात... बयडी म्हणजे गावातील सर्व गुरे एका ठिकाणी जंगलात सोडून देतात ती जागा!!!!पण एके दिवशी अचानक शाळेचे गुरूजी बयडीला हजर होतात.. सोबत गुंडाळी फळा, सानिटायझर, मास्क, खडू...!! आणि भरायला लागतो बिनभिंतीची मनसोक्त शाळा....

दिवसांगणिक दिवस त्या शांत हिरवाईने नटलेल्या डोंगरांना शिक्षणाची बाराखडी ऐकावीशी वाटू लागते..! रोज 2 ते 3 तास मुलांसोबत शिक्षक वेळ देऊन हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण दिले जात आहे..! पहिल्या दिवशी चार मुले असणाऱ्या बायडीच्या शाळेत गुरुजी रोज येतात समजल्यावर दोनच दिवसात 20 पर्यंत मुले हजर होऊ लागतात..! मग सुरू होतो आग्गोबाई ढग्गोबाई, कलमांचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इंग्रजीची वर्ड ट्रेन, गणितीय आकडेमोड, सोबत प्रत्यक्ष निसर्गातून भूगोल...!!

या शाळेतील मुलांना पावसामुळे त्रास होऊ नये म्हणून पाड्यावरील अशिक्षित परंतु शिक्षणाचे महत्व माहीत असलेले श्री कोटा शामसिंग पावरा यांनी अभ्यास कुटिया बांधून देत आहेत...!! यास शाळेतील मुख्याध्यापक रुपेशकुमार नागालगावे व इतर शिक्षक श्री तेगा पावरा, दशरथ पावरा आणि लक्ष्मीपुत्र उप्पीन हे वेळोवेळी येऊन या शाळेत सहभागी होतात...!!!! आहे की नाही भन्नाट काल्लेखेतपाड्याची 'बयडी'वाली शाळा...!!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com