उद्योगपती गौतम अदानी यांचे शरद पवार यांनी केले कौतुक, म्हणाले...

उद्योगपती गौतम अदानी यांचे शरद पवार यांनी केले कौतुक, म्हणाले...

पुणे | Pune

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्यावतीने (Jain International Trade Organization Pune) पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी (Industrialist Gautam Adani) यांचे कौतुक केले. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते प्राईड ऑफ पुणे पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

गौतम अदानी (Industrialist Gautam Adani) यांनी शुन्यातून सुरुवात केली असून आता देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. एकेकाळी बिर्ला (Birla) आणि टाटा (Tata) यांचा श्रीमंतांच्या यादीत समावेश होता. आता त्यांची जागा बदलली आहे. आता आठवडाभरापासून मी एका जैन माणसाबद्दल वाचतोय जो देशातील सर्वात श्रीमंत माणूस बनला आहे. अदानी (Adani) माझे चांगले मित्र असून त्यांनी अगदी शून्यातून सुरुवात केली आहे. आता विमानातून कुठेही गेले तरी अदानी यांचंच विमानतळ (Airport) वापरावं लागतं. जवळपास 70 टक्के विमानतळ अदानी यांच्या मालकीचे आहेत.

पायाभूत सुविधा हा विकासाचा आधार असून या क्षेत्रात अदानी यांचे मोठे योगदान आहे. हे योगदान केवळ अदानी समूहाचे नाही तर देशासाठी आहे. देशाच्या विकासात योगदान देणार्‍या लोकांना आपण विसरू शकत नाही. गौतम अदाणी हे देशाला पुढे घेऊन जात आहेत. विमानसेवा, परदेशात आयात-निर्यात, पायाभूत सुविधा या क्षेत्रात ते चांगले काम करत आहेत, असे कौतुक शरद पवार यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.