फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था - उपमुख्यमंत्री अजित पवार

फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्यूटच्या धर्तीवर फळपिकांच्या संशोधनासाठी ( Fruit crop Research ) स्वतंत्र संस्था उभारण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी गुरुवारी दिली.

महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी ( To increase horticulture )शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, राज्यातील फलोत्पादनवाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करुन त्याचे ब्रॅन्डिंग करणे आदी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलेल्या सूचनांवर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, असेही पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात 'महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा' या विषयावर बैठक झाली. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी राज्यात फलोत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

तर महाराष्ट्रात फलोत्पादनवाढीला आणि फळनिर्यातीला प्रचंड संधी आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणून विकसित करता येईल. फलोत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी जागतिक स्तरावरील उत्कृष्ट वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ब्रॅन्डिंग निर्माण करण्यासाठी, फळप्रक्रिया उद्योग उभारण्यास शासनाने मदत करावी. फळनिर्यातदारांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणा कार्यक्षम करावी, आदी सूचना शरद पवार यांनी बैठकीत केल्या.

राज्यातील फळे आणि भाजीपाला निर्यातक्षम होण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरु असून अॅपेडामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. राज्यातील फलोत्पादन क्षेत्र वाढवताना फळांना जिल्हानिहाय भौगोलिक मानांकन देण्यासाठी त्याचबरोबर ॲव्हाकॅडोसारख्या नवीन फळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिली.

या बैठकीला फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, पोक्राच्या प्रकल्प संचालक इंद्रा मालो, सहाद्री फार्मर्स प्रोड्युसर्सचे विलास शिंदे आदींसह राज्यातील फलोत्पादन, कृषी निर्यात क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी, फलोत्पादन विभागातर्फे राज्यातील फलोत्पादनाबाबत सादरीकरण करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com