औरंगाबाद जिल्ह्यात 164 रुग्णांची भर ; 10 जणांचा मृत्यू

4255 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात 164 रुग्णांची भर ; 10 जणांचा मृत्यू

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 245 जणांना (मनपा 213, ग्रामीण 32) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 29327 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आज एकूण 164 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34550 झाली आहे. आजपर्यंत एकूण 968 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4255 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 89 आणि ग्रामीण भागात 26 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा ( 29)

गुलमोहर कॉलनी (1), म्हाडा कॉलनी (1), सुदर्शन नगर (1), बालाजी नगर (1), जयभवानी नगर (1), सिंधी कॉलनी (1), जालान नगर (1), समर्थ नगर (1), पडेगाव (2), वेदांत नगर (1), एन-2 (1), मगर वस्ती (2), सिडको महानगर (1), वानखेडे नगर (1), टाऊन सेंटर एन-1 (1), शिवाजी नगर गारखेडा (1), रेणूका नगर (1), एन-1 सिडको (1), हर्सूल सावंगी (1), ठाकरे नगर एन-2 (1), घाटी रुग्णालय परिसर (2) भावसिंगपूरा (2), विशाल नगर (1), गारखेडा (1), विश्वभारती कॉलनी (1),

ग्रामीण (20)

फुलंब्री (1), तिसगाव (1), साई मंदिर बजाज नगर (1), माळी गल्ली रांजणगाव (1), लासूर (5), पैठण (4), लक्ष्मी नगर वैजापूर (2), पिंपरखेडा कन्नड (2), दहेगाव (1), धनगरवाडी आवाळा कन्नड (1), पिंपळवाडी पैठण (1),

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत विश्रांती नगर औरंगाबाद येथील 65 वर्षीय पुरूष, काळा दरवजा किलेअर्क येथील 85 वर्षीय स्त्री, हर्सूल औरंगाबाद येथील 51 वर्षीय पुरूष, लांजी वाळूज गंगापूर औरंगाबाद येथील 56 वर्षीय पुरूष, कोल्टनवाडी रोड हर्सूल औरंगाबाद येथील 73 वर्षीय पुरूष, भवानी नगर औरंगाबाद येथील 85 वर्षीय पुरूष, बिडकीन पैठण येथील 57 वर्षीय पुरूष, सिडको एन-4 औरंगाबाद येथील 85 वर्षीय पुरूष, शिवाजी नगर औरंगाबाद येथील 68 वर्षीय पुरूष, क्रांती चौक औरंगाबाद येथील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com