
मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi worker) मागण्या प्रलंबितच होत्या. आता या मागण्यांबद्दल राज्य सरकारची (State Government) सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच याबाबत काही महत्वाचे निर्णयदेखील घेण्यात आल्याचे समजते...
राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. तसेच त्यांना मोबाईलदेखील देण्यात येणार आहे.
अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही योजना सुरु केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.