आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ
USER

मुंबई । प्रतिनिधी

आशा स्वयंसेविकांना( Aasha Workers ) राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या ( Aasha Group Promoters ) मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली.

करोना महामारी सुरु असे पर्यंत आशा स्वयंसेविका आणि आशा गटप्रर्वतक यांना दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावित वाढ जुलै २०२१ या महिन्यापासून देण्यात येईल. यासाठी होणा-या अंदाजे १३५ कोटी ६० लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.

केंद्रीय योजनांच्या निधी वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी बँक खात्यांसंदर्भात सुधारित सूचना

केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी वितरण, विनियोग व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने नोडल एजन्सी तसेच अंमलबजावणी याबाबत प्रशासकीय विभागांना बँक खाती उघडण्यासाठी सुधारित सूचना देण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार प्रत्येक विभागाला प्रत्येक केंद्र पुरस्कृत योजनेसाठी एक सिंगल नोडल एजन्सी निश्चित करणे गरजेचे आहे. या एजन्सीने एक सिंगल नोडल बँक खाते उघडणे गरजेचे आहे. राज्य शासनाचे धोरण केंद्र शासनाच्या सूचनांशी सुसंगत करण्याच्या दृष्टिने विभागांच्या सिंगल नोडल एजन्सींना स्टेट बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत बँका, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक बँकांत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com