
पुणे | Pune
आयकर विभागाने (Income Tax Department) पुण्यात सुमारे आठ ठिकाणी छापेमारी केली आहे. उद्योजक आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे (Aniruddha Deshpande) यांचे घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे...
पुण्यात आज आयकर विभागाने 8 ठिकाणी छापे टाकले आहे. अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. त्यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती भल्या पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याचे समजते.
देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि अन्य ठिकाणी देखील तपासणी केली जात आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, देशपांडे यांचे राज्यातील बड्या राजकारण्यांशी निकटचे संबंध आहेत. देशपांडे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय मानले जातात.