IT Raid : मोठी कारवाई! नागपुरात १० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

IT Raid : मोठी कारवाई! नागपुरात १० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

नागपूर | Nagpur

आयकर विभागाने नागपूर शहरात १० ठिकाणी छापेमारी केली आहे. हवाला आणि कन्स्ट्रक्शनशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील 10 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. 7 हून अधिक जणांच्या वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. मुंबईसह नागपूरच्या टीमने ही कारवाई केली आहे.

IT Raid : मोठी कारवाई! नागपुरात १० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी
Samruddhi Mahamarg : मोठी बातमी! समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला

हवाला, बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये करविषयक आर्थिक अनियमितता झाल्यामुळे हे छापे पडल्याची माहिती आहे. मुंबईतील पथक आज पहाटे नागपुरात दाखल झाले. 10 हून अधिक ठिकाणी आयकराने (Income Tax) छापे टाकले. या कारवाईत आयकर विभागाच्या हाती किती मोठे घबाड लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

IT Raid : मोठी कारवाई! नागपुरात १० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी
१२ विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर सुप्रीम कोर्टात 'या' तारखेला सुनावणी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com