महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, साखर उत्पादन ‘इतके’ होण्याची शक्यता

येत्या 15 मे पर्यंत हंगामाची सांगता होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, साखर उत्पादन ‘इतके’ होण्याची शक्यता
साखर कारखाना

पुणे -

महाराष्ट्रातील 2020-21 मधील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या 15 मे पर्यंत हंगामाची सांगता होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत साखरेचे उत्पादन आता 105 लाख टनापर्यंत झाले आहे. हे उत्पादन 107 लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. राज्याचा सध्याच्या सरासरी साखर उतारा 10.48 टक्के इतका आहे. तर साखर उत्पादन 105 टन झाले आहे. एकूण 1001 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. अद्याप 2 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे असे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. याबाबतचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली विभागातील बहुतांश कारखान्यांचे गाळप आटोपले आहे. पुणे आणि सातारामधील बहुतांश कारखान्यांनी आपला हंगाम पूर्ण केला आहे तर काहींचा अंतिम टप्प्यात आहे. मराठवाडा विभागातील कारखान्यांचे गाळप मे अखेरीस संपण्याची शक्यता आहे.

चांगल्या उत्पादनानंतरही साखरेच्या मागणीत कपात झाल्याने शेतकर्‍यांना पैसे देण्यात अडथळे येत आहेत. सध्या ऊस उत्पादकांचे 2,073.05 कोटी रुपये थकीत आहेत. कारखानदारांनी आतापर्यंत 19,286.65 कोटी रुपये शेतकर्‍यांना दिले आहेत. ही रक्कम यंदाच्या हंगामातील एकूण एफआरपीच्या 90.29 टक्के आहे तर 21,359.69 कोटी रुपये इतकी रक्कम कारखान्यांकडून शेतकर्‍यांना देणे बाकी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com