24 तासांत 77 पोलिसांना करोनाची लागण, दोघांचा मृत्यू
महाराष्ट्र

24 तासांत 77 पोलिसांना करोनाची लागण, दोघांचा मृत्यू

सध्या 1 हजार 30 करोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरु

Dhananjay Shinde

मुंबई - देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्यांबरोबरच करोना योद्धे

असलेल्या पोलिसांना देखील करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये आणखी 77 पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला असून दोन पोलीस कर्मचार्‍यांना जीव देखील गमावावा लागला आहे.

सध्या 1 हजार 30 करोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची संख्या आता 59 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com