लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा; कुटुंबीयांनी दिली माहिती

लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा; कुटुंबीयांनी दिली माहिती

मुंबई | Mumbai

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना करोनाची (Corona) लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कॅण्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

मात्र अद्याप त्या आयसीयूमध्येच असल्याचेदेखील त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. लता मंगेशकर यांची प्रकृती कशी आहे, याबाबत त्यांची भाची रचना शहा यांनी माहिती दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना शनिवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. सध्या त्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यामुळे आम्ही आनंदी आहोत. चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनामुळे लता मंगेशकरांची प्रकृती सुधारत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

तर काल डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा होत आहे. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी म्हणाले, की त्या अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये आहेत. मात्र त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com