विकास सोसायट्या होणार सक्षम; आदिवासी महामंडळाचा महत्वाचा निर्णय

विकास सोसायट्या होणार सक्षम; आदिवासी महामंडळाचा महत्वाचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यभरातील अनेक आदिवासी विकास सोसायट्या (Tribal Development Society) कर्जाच्या (Loan) बोजाखाली मोठ्या प्रमाणात दबलेल्या आहेत. अशा सोसायट्यांना आधिक सक्षम करता यावे, हा मुख्य उद्देश ठेवून तसेच धानाची होणारी नासाडी कमी करण्यासाठी या सोसायट्यांना दहा लाख रुपयांपर्यंत गोदाम उभारण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय आदिवासी विकास महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील आदिवासी विकास सोसायट्यांना दिलासा मिळाला आहे...

आदिवासी विकास महामंडळाची (Tribal Development Corporation) ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी (Tribal Development Minister K. C. Padvi) यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी अनेक निर्णयांवर चर्चा करत नवीन अंदाजपत्रकही (Budget) मांडण्यात आले. राज्यात ८५० आदिवासी विकास सोसायटी असून यातील अनेक सोसायट्या कर्जाच्या बोजाखाली आहेत. त्यामुळे या सोसायटींचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

सोसायट्यांवर असलेला कर्जाचा बोजा कमी करून त्या सक्षम व्हाव्यात, यासाठी विकास सोसायटी यांना खरेदी केलेले धान हे चांगल्या ठिकाणी साठवून ठेवता यावे. या साठवलेल्या धानाची पावसाळ्यामध्ये नासाडी होऊ नये, यासाठी गोदाम, ओटे बांधण्यासाठी दहा लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

प्रस्ताव सादर करा

आदिवासी विकास महामंडळातर्फे सोसायटी अधिक सक्षम करण्यासाठी अजून कोणत्या नवीन योजना सुरु करता येईल याबाबत चर्चा होवून पाठपुरावा करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच सोसायटींवरील कर्ज माफ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन मंत्री पाडवी यांनी देत तसे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले.

Related Stories

No stories found.