निरोप घेतो देवा...! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

निरोप घेतो देवा...! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

पुणे | Pune

निरोप घेतो देवा आता..आज्ञा असावी...चुकले असेल काही तर माफी असावी...असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं २४ तासांच्या मिरवणुकीनंतर भावपूर्ण निरोप दिला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला पांचाळेश्वर घाटावर निरोप देण्यात आला. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात बाप्पाचं विसर्जन पार पडलं. भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आलेले श्री स्वानंददेश रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com