राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

मुंबई | Mumbai

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (rain) इशारा दिला आहे.

लातूर, धाराशीव, नांदेड, संभाजीनगर,अहमदनगर, परभणी,बुलढाणा, जालना, जळगाव, अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ७ ते ९ एप्रीलदरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी कनेक्शन, माजी स्वीय सहाय्यकांचा आरोप

राज्यात मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने (Rain) आधीच हैराण झालेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांवर (Farmer) अवकाळी पावसाच मोठं संकट निर्माण झालं आहे.

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
PM मोदींची डिग्री ऐतिहासिक अन् क्रांतिकारी, नव्या संसदेच्या गेटवर लावा; राऊतांची खोचक टीका

पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळडूपर्यंत होत आहे. त्यामुळं या बागात द्रोणीय स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या भागात बाष्प जमा होत आहे. तर दुसरीकडे तापमानही वाढत आहे. साधारणत ३५ अंशाच्या आसपास तापमान आहे. त्यामुळं या भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
शिर्डी पाळणा दुर्घटनेतील जखमी दाम्पत्याला आयुष्यभरासाठी आले अपंगत्व
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com