राज्याला पुन्हा गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा

राज्याला पुन्हा गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई | Mumbai

राज्यात (maharashtra weather upadte) पुन्हा गारपिटीसह जोरदार वारे (Heavy winds), विजांसह वादळी (thunderstorms) पावसाची (rain alert) शक्यता हवामान विभागाने (imd) वर्तवली आहे.

आज मराठवाड्यात (marathawada) जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), उत्तर कोकणातही (North kokan) तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

आज (ता.८) मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

तर उद्या (ता. ९) विदर्भात (vidarbha) गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

उद्यापासून (ता.९) विदर्भात पावसाची शक्यता असून, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com