राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात

jitendra zavar

jitendra zavar

राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम उपनगर आणि ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भालाही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात येत्या 24 तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी 120 मिमीपेक्षाही जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातही अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com