video : बर्‍हाणपूर येथे अवैध शस्त्र जप्त

पाचौरी बनले अवैध शस्त्र निर्मितीचे मोठे केंद्र
video : बर्‍हाणपूर येथे अवैध शस्त्र जप्त

बर्‍हाणपूर - Barhanpur - प्रतिनिधी :

मध्यप्रदेशच्या सीमाभागात बर्‍हाणपूर जिल्ह्यातील आदिवासी वस्ती असलेल्या पाचौरी येथे अजूनही अवैध शस्त्रनिर्मिती सुरु असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

बुधवारी खकनार पोलीसांनी पाचौरी येथून अवैध शस्त्र घेवून येणार्‍या एक तूणास रंगेहाथ पकडून त्याच्याकडून पाच गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. खकनार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. कीर्तनाप्रसाद धुर्वे यांनी सांगितले, की माहिती मिळताच पोलीसांनी खकनार-पाचौरी दरम्यान माता नदीवर असलेल्या पुलावर तपासणी सुरु केली.

यावेळी मोटारसायकलीवर येणारा विनोदसिंह सिकलीगर (वय 29, रा.पाचौरी) याच्याजवळ तब्बल पाच गावठी कट्टे आढळून आले. तो पिस्तूल विकण्यासाठी बर्‍हाणपूरात येत होता.

काही दिवसांपूर्वी गणपति नाका पोलीसांंनी बर्‍हाणपूर येथे तपासणी दरम्यान संतोष चंदवंशी (रा. जयप्रकाश नगर, इटारसी जि. होशंगाबाद) याच्याजवळ चार गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतूसे आढळून आली होती.

चंदवंशी हा देखील पाचौरी येथून गावठी पिस्तू घेवून विकण्यासाठी बर्‍हाणपूरात आला होता. पाचौरी बर्‍हाणपूर पासून 79 कि.मी.वर असून पहाडावर वसलेले आहे.

पाचौरी येथे राहणारा सिकलीगर समाजाचे काही कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून अवैध रित्या शस्त्र निर्मिती करीत आहेत. पाचौरी हे गाव जारही बाजूंनी जंगलाने घेरलेले असून महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com