‘...तर मी माघार घेते’ : धनंजय मुंडेंवर आरोप केलेल्या तरुणीचे ट्विट

‘...तर मी माघार घेते’ : धनंजय मुंडेंवर आरोप केलेल्या तरुणीचे ट्विट

मुंबई -

‘तुम्हा सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते’ असे ट्विट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा या

तरुणीने केले आहे. तक्रारदार तरुणीनं काही ट्वीट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं ट्वीट करत म्हटलं आहे की, एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते.

दुसर्‍या एका ट्वीटमध्ये तरुणीनंं म्हटलं आहे की, मी खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी एवढ्या लोकांना एकत्र यावं लागतंय. मी एकटी विरुद्ध महाराष्ट्र असं चित्र निर्माण झालंय. तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहित बसा. जर मी चुकीची होते तर एवढे दिवसांत माझ्याविरोधात तक्रार का केली नाही? मला पाठीमागे हटावं लागलं तरी मला गर्व आहे की, मी एकटी लढले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com