Omicron ची धास्ती! राज्यात लॉकडाऊन कधी?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं 'हे' उत्तर

Omicron ची धास्ती! राज्यात लॉकडाऊन कधी?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं 'हे' उत्तर

मुंबई | Mumbai

भारतात कोरोनाचा ओमियक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. करोनाच्या ओमियक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

देशात ओमियक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. यामुळे राज्यात नुकतेच काही निर्बंध लागू करणार आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मात्र, ही वेळ नक्की कधी येईल, हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमियक्रॉनची असेल अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ओमियक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता, त्यामूळेच निर्बंध लागू केले असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जर ओमियक्रॉनची गती आणखी वाढत गेली ऑक्सिजनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊनबाबत विचार करत आहोत. ज्या दिवशी ८०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लावावा लागणार. पण कदाचित संसर्गाची गती इतकी असेल तर ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता कदाचित ५०० वर आणावी लागेल अशी परिस्थिती सुद्धा येऊ शकते, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

तसेच, दुपटीनं रुग्ण वाढण्याचं प्रमाण असं सुरु राहिलं, तर आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं आहे. परदेशात लाखात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. ओमियक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर रुग्णवाढीनं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com