को-265 उसाची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाकारणार

राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी कारखान्यांना नोटीस
को-265 उसाची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाकारणार

नेवासा (तालुका प्रतिनिधी) -

को - 265 जातीच्या उसाची नोंद घेण्यास नकार देणाऱ्या साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने दणका दिला असून ऊस नोंद न केल्यास गाळप परवाना नाकारण्याचा इशारा दिला आहे. याबाबत साखर सहसंचालक विकास पांडुरंग शेळके यांनी मंगळवार दि. 11मे रोजी राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी कारखान्यांना नोटीस काढली आहे.

साखर आयुक्तालयाने या नोटीसमध्ये म्हंटले आहे की, ऊस शेतकऱ्यांच्या को- 265 या जातीच्या ऊसाच्या नोंदी काही सहकारी व खाजगी साखर कारखाने घेत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने को- 265 या जातीच्या ऊसाच्या नोंदी घेणेबाबत व गाळप करणेबाबत यापूर्वी दि. 16 नोव्हेंबर 2018 रोजी सर्व साखर कारखान्यांना सूचना दिलेल्या होत्या.

तरीही काही कारखाने शेतकऱ्यांच्या को- 265 या जातीच्या ऊसाच्या नोंदी घेणे नाकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. साखर कारखान्यांची ही कृती शासन धोरणा विरुद्ध असल्याचे स्पष्ट होते.

मध्यवर्ती ऊस संशाधन केंद्र पाडेगाव येथे विकसीत केलेल्या को- 265 या ऊस जातीच्या लागवडीस महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे. को- 265 या ऊस जातीच्या लागवडीस शासनाची परवानगी असून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI ) ने ऊस वाण लागवडीस व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित केलेले आहे. त्यामुळे सर्व

साखर कारखान्यांना पुन्हा सूचना देणेत येते की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या को-265 या ऊस जातीची नोंदी घेण्यात यावी. ज्या साखर कारखान्यांमार्फत को-265 जातीच्या ऊस लागवडीची नोंदी घेतली जाणार नाही त्या साखर कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल. शेतक-यांच्या अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा प्राप्त होणार नाही याची दक्षता संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाने घ्यावी.

पश्चिम मराराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा...

साखर सहसंचालक शेळके यांच्या या आदेशाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकऱ्यांना होणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर 265 वाणाची लागवड करण्यात आली असून उतारा कमी येतो आणि वजन जादा भरते या सबबीखाली कारखाने लागवड करूच नये म्हणून दबाव आणत होते. तरीही शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर आता नोंद करणे नाकारले जात आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर शासनाकडे धाव घेतली होती. या आदेशाने त्यांना दिलासा मिळाला आहे.

....तर गाळप परवाना नाही

ज्या साखर कारखान्यांमार्फत को-265 जातीच्या ऊस लागवडीची नोंदी घेतली जाणार नाही त्या साखर कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल. शेतक-यांच्या अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा प्राप्त होणार नाही याची दक्षता संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाने घ्यावी.

पांडुरंग शेळके

सहसंचालक साखर (विकास)

अहमदनगर (प्रतिनिधी) - को 265 ऊस जातीच्या लागवडीस शासनाची परवानगी असून व्हीएसआयने हे ऊस वाण लागवड व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. त्यामुळे या ऊसाची नोंद घ्यावी अन्यथा त्या साखर कारखान्याचा गाळप परवाना नाकारण्यात येईल, असा इशारा प्रदेशिक सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी दिला आहे. या निर्णयामुळे को 265 ऊस लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांनी को 265 ऊसाची लागवड केली आहे. पण या जातीच्या ऊसाची नोंद काही सहकारी, खाजगी साखर कारखाने घेत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. त्यामुळे याबाबत त्यांनी साखर आयुक्तालयाकडे तक्रारी केल्या. साखर आयुक्त कार्यालयाने या जातीच्या ऊसाच्या नोंदी घेण्याबाबत व गाळप करण्याबाबत यापूर्वी 16 नोव्हेंबर 2018 रोजी सर्व साखर कारखान्यांना निर्देश दिले होते. तरीही काही कारखान्यांनी या जातीच्या ऊसाच्या नोंदी घेणे नाकारत होते. याची दखल साखर आयुक्तालयाने घेतली असून याबाबत सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना इशारा दिला आहे. याबाबत अशा प्रकारच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्यासही कारखान्यांना सांगण्यात आले आहे.

साखर आरुक्तांची भूमिका स्वागतार्ह-पटारे

को-265 प्रजातीचा ऊस वाण प्रतिकुल परिस्थितीत तग धरून राहणारी तसेच तोडणीला विलंब झाल्रास कांडीस दशी न पडणारी,इतर प्रजाती च्रा तुलनेने शेतकर्‍रांना जास्त वजन मिळवुन देणारी,खोडवा-निडवा सुद्धा चांगले फुटवे करणारी,पाण्राचा टचका सहन करूनही फारसे नुकसान न होणारी म्हणूनच शेतकर्‍रांना वरदान ठरलेली ऊस प्रजात असुन,महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली व महाराष्ट्र शासनाने मान्रता दिलेली ऊस प्रजाती आहे. तरीही राज्रातील काही साखर कारखाने ऊस लागवडीच्रा नोंदी घेण्रासाठी टाळाटाळ करीत असल्राच्रा तक्रारी आल्रानंतर शेतकरी संघटनेने कारखानदारांची मनमानी साखर आरुक्त डॉ. शेखर गारकवाड रांच्रा निदर्शनास आणुन दिली होती. साखर आरुक्तांनी गंभीर दखल घेत कारखानदारांचे कान टोचले आहेत. साखर आरुक्तांची भूमिका स्वागतार्ह असल्राची प्रतिक्रिरा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्रक्ष बाळासाहेब पटारे रांनी व्रक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com