पती-पत्नीचे भांडण, मेव्हणी आली मदतीसाठी धावून अन् पुढे घडले असे काही...

क्राईम
क्राईम

बदलापूर | Badlapur

येथे मालमत्तेच्या वादातून पतीने पत्नीवर हल्ला (Attack) केला. यामुळे बहिणीला वाचविण्यासाठी दुसरी बहिण (sister) धावून आली. मात्र नराधमाने मेव्हणीचाच खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे...

तसेच नराधमाने सासूवरदेखील चाकूने वार केले असून पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाल्या आहेत. मेव्हणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बदलापूर (Badlapur) गावातील जांभळा रोडला येथील सनसेट हाईट इमारतीत फरीदा सय्यद आपल्या दोन लेकी निलोफर आणि सनोबरसह नातवंडांसोबत राहतात. निलोफर हिचे लग्न झाले होते. मात्र नवऱ्यासोबत सततच्या वादाला कंटाळून ती आईकडे राहायला आली होती.

सोमवारी निलोफरचा नवरा मोहम्मद आयुब शेख सासरी आला. त्यानंतर नेहमीप्रमाणे तो प्रॉपर्टीवर वाद घ्यालायला लागला. मोहम्मदने निरोफरवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

निरोफरला वाचविण्यासाठी बहिण आणि आई गेली असता त्यांच्यावरही नराधमाने हल्ला केला. हल्ल्यात त्याने मेव्हणी सनोबरची हत्या केली.

दरम्यान निलोफर आणि फरीदा सय्यद या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com