HSC Exam 2022 : इंग्रजीच्या पेपरमध्ये बोर्डाकडून चूक, ‘त्या’ प्रश्नाचा १ गुण विद्यार्थ्यांना मिळणार

HSC Exam 2022 : इंग्रजीच्या पेपरमध्ये बोर्डाकडून चूक, ‘त्या’ प्रश्नाचा १ गुण विद्यार्थ्यांना मिळणार

मुंबई | Mumbai

बारावीच्या (HSC) महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षांना (Maharashtra Board Exams) राज्यात ४ मार्च पासून सुरूवात झाली आहे. या परीक्षेमध्ये पहिलाच पेपर इंग्रजी (English) विषयाचा झाला आहे. या पेपर मध्ये एक प्रश्न चूकीचा असल्याने त्याचा १ गुण विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे बोर्डाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary) जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर (english subject paper) झाला आणि त्यात चुका आढळल्याची तक्रार विद्यार्थी, शिक्षकांनी केली.

बोर्ड अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक १) A) ५ हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्रजी पेपर मध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा १ मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com