हॉटेलचे जेवण महागणार

इंधन दरवाढीचा खवय्यांना फटका
हॉटेलचे जेवण महागणार

मुंबई ।वृत्तसस्था Mumbai

कुठल्याही गोष्टीचे सेलिब्रेशन करायचे असेल तर हक्काचे ठिकाण असते ते म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंट... Hotel & Resturant...पण आता हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाणेही खिशाला परवडणारे राहिलेलेे नाही. कारण हॉटेल, रेस्टॉरंटमधील पदार्थांच्या किंमती 30 टक्क्यांनी महागणार आहेत. इंधन दरवाढीपाठोपाठ, व्यावसायिक सिलेंडर commercial Cylinders दरातील वाढीचा फटका आता खवय्यांनाही बसणार आहे. कारण, दैनंदिन खर्च भरून काढण्यासाठी लवकरच हॉटेलातील खाद्यपदार्थाच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असे हॉटेल चालकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

करोना आणि लॉकडाऊनमुळे काही काळ व्यवसाय बंद असल्यानं खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट झाली. त्यावेळची नुकसान भरपाई काढताना आणि व्यवसायात तग धरुन ठेवण्यासाठी खाद्यपदार्थाच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असे शेट्टींनी म्हटलेय. त्यामुळे आता तुमचे हॉटेलातील डाईन-इनही महागणार आहे.

सरासरी बघता वेगवेगळ्या हॉटेल्सचे वेगवेगळे दर असतात. वेगवेगळ्या हॉटेल्सचा खर्चदेखील वेगळा असतो. सोबतच हॉटेलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना देखील पैसे वाढवून द्यावे लागतात. 1 जानेवारीपर्यंत ही भाववाढ अपेक्षित आहे. सरासरी बघता 15-20 टक्के भाववाढ झाली तरच रेस्टॉरंट व्यवसायिकांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया आहार संघटनेकडून देण्यात आली आहे.

छोट्या हॉटेल्समध्ये दिवसाला दोन व्यावसायिक सिलेंडरचा वापर होतो. तर मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सरासरी पाच सिलेंडर्स वापरली जातात. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सरासरी व्यवसायिक सिलेंडरचा भाव हजार रुपयांच्या आसपास होता आता तो दोन हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. परिणामी, हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे आणि उत्पन्नात घट झाल्याचे चित्र आहे .

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सरासरी व्यवसायिक सिलिंडरचा भाव हजार रुपयांच्या आसपास होता आता तो दोन हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. परिणामी, हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे आणि उत्पन्नात घट झाल्याचं चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com