धक्कादायक! उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा निर्दयी खून

धक्कादायक! उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा निर्दयी खून

पुणे | प्रतिनिधि

एका हॉटेल चालकाने उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा निर्दयी खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तिन्ही कचरा वेचक भिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी हे हत्याकांड झाले,त्या ठिकाणपासून सासवड पोलिस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. या हत्याकांडातील आरोपी पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप हे स्थानिक आमदाराचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप या हॉटेल चालकाने कचरा वेचक भिकाऱ्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकून त्यांचा खून केला आहे. ही घटना २३ मे रोजी सासवडमध्ये घडली आहे. या हत्याकांडातील मयत तिन्ही भिक्षेकरी पपू जगताप यांच्या हॉटेल जवळ असलेल्या अहिल्यादेवी मार्केट जवळ ओसरीवर दररोज बसत होते.

याचाच राग मनात धरून पप्पू जगताप यांनी या तिघांना सर्वप्रथम काठीने मारहाण केली. पण भिकारी अजून कसे गेले नाहीत, म्हणून पप्पू जगताप याने त्याच्या हॉटेलमधील गरम पाणी या तिन्ही भिकाऱ्यांच्या अंगावर ओतले. यात तिन्ही भिकारी पूर्णपणे भाजून निघाले आणि यात तिघांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ३० मे रोजी सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपी पप्पू जगताप हा अजूनही फरार आहे. घटना ही २३ मे घडली असताना गुन्हा हा ३० मे रोजी दाखल झाल्याने पोलिसांवर स्थानिक आमदारांचा दबाव होता की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

२३ मे रोजी जेव्हा घटना घडली तेव्हा जे तीन भिकारी या घटनेत जखमी झाले होते. त्यापैकी दोन जणांचा ससून रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला तर तिसऱ्या शेवंताबाई जाधव यांच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली होती. काल त्यांचाही मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com