गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख
महाराष्ट्र

गृहमंत्र्याकडून 'त्या' व्हायरल आजीचा सन्मान

साडी-चोळीसह लाख रुपयांचा धनादेश

Gokul Pawar

Gokul Pawar

पुणे । Pune

लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या पुण्याच्या शांताबाई पवार ( Shantabai Pawar) या ८५ वर्षांच्या आजींचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानतर माध्यमांनीही त्याची दाखल घेतली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) याची दाखल घेत शनिवारी या आजीबाईंची भेट घेतली. आजींना एक लाखाचा धनादेश आणि नऊवारी साडी देऊन देशमुख यांनी त्यांचा सन्मान केला. याबाबतचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला.

वयाच्या आठव्या वर्षी शांताबाई पवार यांनी हा लाठ्याकाठ्यांचा खेळ (ढालपट्टा) खेळण्यास सुरुवात केली. या काळात ‘सीता और गीता’ सिनेमात ‘अनाडी है कोई खिलाडी है कोई’ या गाण्यात हेमा मालिनी यांच्या डमी म्हणून डोंबारी खेळ त्यांनी खेळले. याशिवाय त्रिदेव सिनेमा, एक मराठी चित्रपट अशी काही शूटींगही त्यांनी केली. उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे दहा अनाथ मुलींचा साभाळ करते, तिघींना लग्न करुन सासरी पाठवले, असेही आजींनी सांगितले. कोरोनाची भीती होती, मात्र फिकीर न करता घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले, असं आजी सांगतात.

शांताबाई पवार या 85 वर्षीय आजींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. यानंतर अनेकांनी त्यांना मदतीसाठी हात पुढे केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यातील शांताबाई पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक लाख

रुपये आणि नऊवारी साडी भेट देत त्यांचा सन्मान केला. तसेच शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासनही गृहमंत्र्यांनी त्या आजींना दिले.

आज पुणे येथील वॉरिअर आजी ‘शांताबाई पवार’ यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अनेकांकडून मला ८५ वर्षांच्या शांता आजींची जगण्याची कसरत समजली. त्यांना भेटून मला एक नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली. मी पक्षातर्फे एक लाख रुपये व नऊवारी साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मान केला,” असे ट्विट

अनिल देशमुख यांनी केले. तसेच याबाबतचा व्हिडीओही त्यांनी ट्विट केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com