मुंबई l Mumbai

बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या युवतीने पुण्यात आत्महत्या केली असून, या आत्महत्या प्रकरणात राज्यातील एका मंत्र्यांचे नाव समोर आल्याने सदर प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

विरोधक आणि राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या कथित आत्महत्या प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकारपरिषदेत बोलताना अनिल देशमुख म्हणाले, या संदर्भात अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की, नियमानुसारच चौकशी होणार आहे. विरोधीपक्ष ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत, त्या आरोपात काही तथ्य नाही. पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. संजय राठोड कुठं आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी गृहखात्याचा मंत्री म्हणून सांगतो की, नियमानुसार चौकशी व कारवाई होणार आहे. जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रा समोर येईल. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर, वस्तूस्थितीसमोर आल्यानंतर राज्यशासन निर्णय घेईल. असे त्यांनी म्हंटले आहे.

यावेळी देशमुख यांनी त्यांनी सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगितलं. सेलिब्रिटींच्या ट्वीट प्रकरणात माझा शब्दाचा विपर्यास केला गेला. आम्ही भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे. १२ लोकांची ओळख झाली आहे, त्यांची चौकशी होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर हे आमचे दैवत आहे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वाक्याचा विपर्यास केला', असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.