
मुंबई l Mumbai
मुंबईसह उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. तसेच, शहरात सखल भागांत पाणी साचले आहे.
एकीकडे सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही उधाण आले आहे.
मुंबईच्या समुद्रात सध्या ४.४७ मीटर्सपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांकडे न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.