राज्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या गुरुवारी मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई | Mumbai

हवामानातल्या बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं आहे. यामुळे आज तब्बल 5 राज्यामध्ये मुसळधार पावसाचाअंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगनासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये 13 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तयार झालेले कमी तिव्रतेचे वादळ बुधवारी राज्यात धडकणार असून त्याचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट देण्यात आला असून दक्षता घेण्याची सूचना हवामान विभगणे दिली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसामुळे राज्यभरात कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा चार दिवस मोठ्या पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने (डीप डिप्रेशन) मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. पुढील बारा तासांत पश्चिम- वायव्य दिशेला सरकताना डिप्रेशनची तीव्रता कमी होऊन त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावरून सरकत हे कमी दाबाचे क्षेत्र 16 तारखेच्या सकाळी उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करेल. त्याच भागावर त्याची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com