
पुणे -
पुणे शहरातील उपनगरांध्ये आज दुपारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. बिबवेवाडी वारजे माळवाडी, सदाशिव पेठ,
सिंहगड रस्ता, मार्केटयार्ड, चंदननगर, वडगाव शेरी, कात्रज, सुखसागर, वानवडी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होतेे. पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस झाला.
पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, दक्षिण कोकण ते विदर्भापर्यंत असलेल्या चक्रिय स्थितीमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाच्या प्रभावामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता कायम असून, येत्या तीन ते चार तासात पुण्यासाहित नाशिक, धूळे, सोलापूर, नंदूरबार, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिला होता.