पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई | Mumbai

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील २४ तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असताना, त्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने आज पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com