IMD : राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचे

IMD : राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचे

मुंबई | Mumbai

राज्यात पुढील चार दिवसात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. दि. १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह मध्यम व किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे...

या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि संलग्न मराठवाडा भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील, अशी माहिती आयएमडीचे संचालक के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिली आहे.

दि. १२ नोव्हेंबरला कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर तर दि. १३ नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, पुणे, परभणी, हिंगोली पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दि. १४ नोव्हेंबरला ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली तर दि. १५ नोव्हेंबर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिकमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. नागपूर आणि अकोल्यात थंडीची लाट सुरुवात झाली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांत पुण्यातदेखील तापमानाचा पारा घसरला आहे. सध्या राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. नाशिक, नागपूरला मागे टाकत पुण्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com