राज्यात "या" जिल्ह्यात पुढील 3-4 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता - IMD

हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिली माहिती
राज्यात "या" जिल्ह्यात पुढील 3-4 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता - IMD

मुंबईत | Mumbai

महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार लातूर, परभणी, मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यात पुढील 3-4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी माहिती दिली आहे.

मात्र राज्यातील अन्य भागात वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये 17 सप्टेंंबर पासुन पावसाचा जोर आणखीन वाढेल असेही सांंगण्यात आले आहे. 17 सप्टेंंबर पासुन कमी दाबाचा एक पट्टा निर्माण होईल आणि म्हणुन पावसाचा जोर वाढेल असे सांंगितले आहे. तर मुंंबई व कोकणात काही दिवस अगदी तुरळक पाऊस होईल असेही सांंगण्यात आले आहे. IMD चे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K.S Hosalikar) यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com