Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई | Mumbai

राज्यातील विविध जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नद्या, नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहताना दिसत आहे. तर काही ठिकाणी अति पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Life Disrupted) झाल्याचे पाहायला मिळत आहे...

तसेच काल मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरला (Nagpur) झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. तर अहमदनगर, जळगाव आणि बीडमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यानंतर आज पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसणार असून काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका! ३ रौप्य अन् 2 कांस्यपदक जिंकलं

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि परिसरात वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर आज हवामान विभागाने विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, आज हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून राज्यातील ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे , छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच २५ सप्टेंबरपासून मान्सूनचा भारतातून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट
प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रमाने नाशिकची वाटचाल कुपोषण मुक्तीकडे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com