राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाचा इशारा

काही ठिकाणी अतिमुसळधार
राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई -

राज्यात आठवडाभर मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक वेधशाळेनं दिला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहिल त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ तसेच कोकणात बर्‍याचशा ठिकाणी येत्या चार-पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे अशी हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूते यांनी ही माहिती दिली.

तसेच येणार्‍या आठवड्यात (11 ते 17 ऑक्टोबर) महाराष्ट्रात कोकणासह आतल्या भागात पाऊस पूर्णत: सक्रीय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पीकांवरती दाट प्रभाव होण्याची शक्यता आहे, असा इशारा मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com