Mumbai Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; लोकलची वाहतूक कोलमडली

मिठी नदीने धोका पातळी ओलांडली
Mumbai Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; लोकलची वाहतूक कोलमडली

मुंबई | Mumbai

मुंबईकरांची सकाळ आज पावसाच्या दमदार बॅटिंगने झाली आहे. रात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे शहरात सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे.

पावसामुळे लोकलची वाहतूक कोलमडली आहे. मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरु आहे. मध्य रेल्वेची वाहतूक स्लोवरून फास्टवर वळवण्यात आली आहे. कुर्ला- विद्याविहारची (Kurla -Vidyavihar) वाहतूक २० ते २५ मिनिट उशिरानं सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये शहरात आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार वर्षाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वामानखात्याने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com