आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक
महाराष्ट्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

पार्थिवावर २ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार

Sunil Borase

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. राजेश टोपे यांच्या आईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या ७४ वर्षाच्या होत्या. जवळपास दीड महिन्यापासून पासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. एकीकडे आईची काळजी घेणे आणि दुसरीकडे करोनाची लढाई लढणे अशी दुहेरी कसरत गेल्या महिनाभरापासून टोपे यांची सुरू होती.

‘आईला ह्रदयविकाराचा आणि मूत्रपिंडाचा आजार होता. एक वर्षाचा असताना तिची हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. रोज सकाळी तिची भेट घेतो. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा भेटतो. आईची काळजी घेण्यासह राज्याला गरज असताना कार्यरत असणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे टोपे यांनी त्यांच्या आईची प्रकृती गंभीर झाली होती त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

जालन्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पार्थिवावर २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड, जिल्हा जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com