आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्री म्हणाले...

आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्री म्हणाले...

मुंबई | Mumbai

आरोग्य विभागाची (Department of Health) २५ आणि २६ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा रद्द झाली (Exam canceled) असून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याने परिक्षार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र, आता या परीक्षा कधी होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यायाबात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

या संदर्भात माध्यमांशी बोलताना राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले, 'परीक्षा घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून खासगी कंपन्या निवडल्या जातात. या कंपन्या परिक्षेसाठीचं सगळं नियोजन करतात. राज्य शासन फक्त पेपर काढण्याचं काम करतं. सध्या परिक्षेचे पेपर छापून तयार आहेत. या परिक्षेसाठी निवडलेल्या कंपनीने बरीचशी कामं केली आहेत. मात्र, जी वेळेत करायला हवीत ती केलेली नाहीत. त्याचा सातत्याने पाठपुरावा आरोग्य विभाग करत होतं. मात्र, काही गोष्टी त्यातून राहून गेल्या. केंद्र तयार करण्यासंदर्भातली काही कामं राहून गेल्याचं आमच्या लक्षात आलं.' (Health Department New Exam Date)

तसेच पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, 'आरोग्य विभागाशी संबंधित जरी थेट हा विषय नसला तरी आयटी विभागाने दाखवलेल्या असमर्थतेमुळे ही वेळ आली. पण परीक्षा रद्द झालेली नाही, परीक्षा नियोजित पद्धतीने होणार, परीक्षा लांबणीवर पडली आहे, न्यासा कंपनीने असमर्थता दाखवली, या कंपनीने आता दहा दिवसांचा वेळ मागितला आहे, त्यामुळे ही परीक्षा होणारच आहे, ठरलेल्या जागा भरल्या जाणार आहेत.' तसेच 'विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं राजेश टोपे म्हणाले. उद्याच बैठक घेऊन परीक्षेची तारीख ठरवली जाईल, असं ते म्हणाले.

Related Stories

No stories found.