हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ
महाराष्ट्र

महिला बचतगटांना व्यावसायिक विकासाची संधी - हसन मुश्रीफ

ऑनलाइन मेळाव्यात राज्यभरातून सुमारे एक लाख महिला सहभागी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनास अ‍ॅमेझॉनद्वारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम उमेद अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. करोना काळात ऑनलाईन खरेदीस चालना मिळाली आहे. त्या अनुषंगाने करोना संकटामुळे निर्माण झालेली स्थिती ही अर्थार्जनाच्या संधीत परावर्तित करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे आयोजित ऑनलाइन महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात राज्यभरातून जवळपास एक लाख महिला सहभागी झाल्या होत्या.

15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात मासिक पाळीविषयक जनजागृतीसाठी जागर अस्मितेचा मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त बचतगटांनी सहभागी होऊन अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले. Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM)

‘एक ग्रामपंचायत एक बीसी सखी उपक्रमाला अधिक गती मिळण्याकरीता याच कालावधीत उमेद महिला सक्षमीकरण - बीसी सखी तसेच डिजी पे सखी अभियान’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून ग्रामस्थांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानास यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी बीसी सखी म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com