एकीकडे जामीन, तर दुसरीकडे कोठडी! अ‍ॅड. सदावर्तेंच्या अडचणी काही संपेना

एकीकडे जामीन, तर दुसरीकडे कोठडी! अ‍ॅड. सदावर्तेंच्या अडचणी काही संपेना

मुंबई | Mumbai

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं (Msrtc Bus Strike) नेतृत्व करणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीये.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज गिरगाव न्यायालयानं (Girgaon Court) हजर केले आहे. यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर गिरगाव न्यायालयानं सदावर्ते यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एकीकडे जामीन, तर दुसरीकडे कोठडी! अ‍ॅड. सदावर्तेंच्या अडचणी काही संपेना
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

तर छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सातारा सत्र न्यायालयानं (Satara Court) अ‍ॅड. सदावर्ते यांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान अ‍ॅड. सदावर्ते यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने विविध प्रकरणांमध्ये चौकशीसाठी त्यांची पोलीस कोठडी मागण्यात येत आहे. त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झाल्याने त्या देखील अडचणीत आल्या आहेत.

एकीकडे जामीन, तर दुसरीकडे कोठडी! अ‍ॅड. सदावर्तेंच्या अडचणी काही संपेना
Hina Rabbani Khar : ब्युटी विथ ब्रेन! शाहबाज सरकारच्या राज्यमंत्री 'हिना रब्बानी खार' चर्चेत

Related Stories

No stories found.