Maratha Reservation : वकील गुणरत्न सदावर्तेंची मराठा आंदोलनाविरोधात याचिका; 'या' तारखेला होणार सुनावणी
मुंबई | Mumbai
राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी उपोषण, आंदोलने, गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बेमुदत उपोषणाचे शस्र उपसत राज्य सरकारला जेरीस आणले आहे...
अशातच आता या मराठा आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या याचिकेमध्ये मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर ०८ नोव्हेंबर रोजी सुनावणी (Hearing) होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. एकीकडे मराठा आंदोलक आक्रमक झाले असताना आणि खुद्द सदावर्ते यांच्या चारचाकी गाड्या फोडलेल्या असतानाही त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका (Petition) केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण न्यायालयात (Court) रद्द ठरवण्यात आलेले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी मराठा आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा समाज सदावर्ते यांच्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.