'अतिवृष्टी'चा फटका! ४३६ मृत्यू, १७ लाख हेक्टर शेतीचं नुकसान

मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी दिली माहिती
'अतिवृष्टी'चा फटका! ४३६ मृत्यू, १७ लाख हेक्टर शेतीचं नुकसान

मुंबई | Mumbai

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update) राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याच नुकसानीचा आढावा घेतला आहे. राज्यात झालेल्या नुकसानीची आणि पंचनाम्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

वडेट्टीवार यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ४३६ मृतांपैकी ६ जणांचे मृतदेह अद्याप हाती आलेले नाहीत. १३६ जण जखमी झालेले आहेत. उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद आणि जळगाव येथे आपत्ती निवारण दल मदतकार्य करत होते. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरद्वारे १६ तर बोटीद्वारे २० जणांना वाचवण्यात आले आहे. लातूरमध्ये हेलिकॉप्टरने ३ तर बोटीद्वारे ४७ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. औरंगाबादमध्ये २४ लोकांना बोटीद्वारे वाचवण्यात आले. या महिन्यात ७१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर २६ जण जखमी झाल्याची नोंद आहे.

लहान मोठे सर्व प्रकारच्या ५७ जनावरांचा मृत्यू वीज पडून झाला आहे. तर १९६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. १७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून आत्तापर्यंत ८१ टक्के पंचनामे झाले आहेत. पावसामुळे १९ टक्के पंचनामे बाकी आहेत. अजूनही काही माहिती प्राप्त होत आहे. हे नुकसान गुलाब चक्रीवादळापूर्वीचे आहे. २२ लाख हेक्टर शेती उध्वस्त झाल्याचा माझा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.