नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

राज्यात सुरू असलेल्या जलजागृती सप्ताहाचे निमित्ताने राज्यातील 31 मार्च अखेरची भूजल पातळी मोजली जाणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ.मल्लीनाथ कलशट्टी यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पूरवठा आणि स्वच्छता विभाग , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांचे वतीने आयोजित केलेल्या "आओ भूजल जाने" या शृंखलेतील 9 वा वेबिनार मध्ये जल सुरक्षेसाठी पाण्याचा ताळेबंद या विषयावरील परिसंवादाचा समारोप प्रसंगी सहभागी जलनायक,जलप्रेमी, जलसेवक व भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे उपसंचालक, वरिष्ठ व कनिष्ठ भूवैज्ञानिक यांचेशी संवाद साधतांना डॉ.कलशेट्टी बोलत होते. यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, सांगलीचे जलनायक प्रकाश पाटील, अहमदनगरचे जलप्रेमी सुखदेव फुलारी आदी या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते.

डॉ.कलशेट्टी पुढे म्हणाले,राज्यातील जनतेमध्ये भुजल विषयी जनजागृती करून भूजल पातळी वाढविण्याच्या कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे.राज्यातील 31 मार्च 2021 अखरेची भूजल पातळी मोजली जाणार आहे.त्यासाठी त्यात्या गावातील ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी,शासन निर्णयानुसार जलसाक्षरता केंद्राने नेमलेले आणि ते अधिकृत असलेले जलनायक, जलप्रेमी, जलकर्मी व जलसेवकांची याकामी मदत घ्यावी.वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी कोरोनाचे नियम पळून,सामाजिक अंतर ठेऊन सर्वांना निरीक्षण विहिरीची ओळख करून द्यावी अशा सुनचा केल्या. पाण्याचा ताळेबंद किंवा अंदाजपत्रक जलव्यवस्थापनाचे एक प्रभावी साधन आहे . प्रत्येक गावात पडणारा पाऊस स्थानिकरित्या मोजला गेल्यास ग्रामस्तरावर त्याचे नियोजन करून , पाण्याचा वापर कसा करावा याचा निर्णय घेण्याकरिता ग्रामस्तरीय पाण्याचा ताळेबंद गावांच्या सहकार्याने मांडणे आवश्यक आहे.

पहिल्या सत्रात निवृत वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.शशांक देशपांडे यांनी गाववार ताळेबंद व निरीक्षण विहीरी यांच्या बाबत अत्यंत मोलाची तांत्रीक माहिती सहज आणि सोप्या पध्दतीने सांगीतली.

दुसऱ्या सत्रात औरंगाबाद विभागाच्या उपसंचालिका श्रीमती मेघा देशमुख यांनी लोक सहभागातून प्रकल्पीय प्रगती व महाराष्ट्र जल क्षेत्र सुधार प्रकल्प (MWSIP) प्रकल्पातील गावाची केस स्टडी उलगडली.

या वेबिनारचे माध्यमातून डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सारख्या भुजलावर तळमळीने काम करणाऱ्या सेवाभावी अधिकाऱ्याशी सर्वांना संवाद साधता आला.भूजल सर्वेक्षण यंत्रणा म्हणून एक वेळी यंत्रणा अस्तीत्वात आहे हेच मुळी 90 % जनतेला अजून माहिती नाही. त्यातून संचालकपद म्हणजे तांत्रीक यंत्रणेचा प्रशासकिय मुख्य असेच बहुतांशी वेळा आढळून येते. यापूर्वी शेखर गायकवाड यांनी या विभागाचे संचालक पद भूषविलेले आहे.त्यांनी या माध्यमातून लोकाभिमुख काम करून भूजल योशोगाथेच्या माध्यमातून नेमकं भूजल म्हणजे काय? पावसाच्या प्रत्येक थेंबाचा भुजला पर्यंतचा प्रवास त्यांनी लोकांना शिकविला.त्यांच्या नंतर डॉ.कलशेट्टी यांनी हा विभाग अधिक जोमाने पुढे नेत अधिक लोकाभिमुख केला आहे.

या वेबनार नंतर त्यांनी भुजल विकास यंत्रणेच्या अधिकारी वर्गाची आढावा मिटिंग घेतली.मागील आठवड्यातील चर्चेत ठरलेल्या बाबींवर कार्यवाही झाली किंवा नाही याचा जिल्हानिहाय आढावा घेतला. सर्व अधिकाऱ्यांनी अटल भूजल योजना ही गाव स्थरावर जाऊन लोकसहभागातूनच राबवावी या सुचनेवर त्यांनी अधिक भर दिला. कार्यालयात एसी मध्ये बसून नियोजन करू नका तर शेताच्या बांधावर जाऊन नियोजन करा,एकटयाने काम करण्यापेक्षा गावातील सेवाभावी संस्था,जलनायक, जलप्रेमी, जलसेवक, जलकर्मी, पाणी फाउंडेशन, VIST सारख्या संस्थाना बरोबर घेण्याची सूचना केली. पारदर्शक व वास्तवीकतेला अनुसरूनच गावनिहाय आराखडे बनवा, आराखडे अधिकारी यांनी बनवण्या पेक्षा, गावस्थरावरील कार्यकत्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कडून आराखडे बनवून घ्या अश्या प्रकारच्या अनेक मौलीक सुचना दिल्या. कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरत समुपदेशन करत त्यांच्या मधल्या माणसाला साद घातली तर गुणी अधिकाऱ्यांना शाबासकी देत त्यांचे कौतूक करत त्यांचा हुरूप वाढवला जातो. प्रत्येक वेबनारला जलमित्र, जलसेवक आणि जलनायक, जलप्रेमी यांना अवर्जुन निमंत्रीत करण्याच्या सुचना डॉ.कलशेट्टी यांनी दिल्या. कनिष्ठ भूवैज्ञानिक सुवर्णा शितोळे यांनी स्वागत केले.

नगरचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांचे कौतुक...

यावेळी नगर जिल्ह्यात भूजल माहिती केंद्र स्थापन केले व विहिरींची भूजल पातळी मोजण्याचा उपक्रम हाती घेतल्या बद्दल संचालक डॉ.कलशेट्टी यांनी नगरचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांचे विशेष कौतुक केले.

डॉ.कलशेट्टी यांचा स्वच्छाता योध्दाचा प्रवास जलनायकाकडे प्रवास...

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील या स्वच्छाता योध्दाचा प्रवास जलनायकाकडे चालू झालेला आहे. साधेपणा सच्चाईतून व तळमळीने तो नव्या विधायक जलक्रांतीचे बीज प्रत्येकाचे मनात रुजविण्याचे काम त्यांनी सुरू केलेले आहे. त्यांच्या या प्रयत्नाने अटल भूजल योजनेच्या रूपातून महाराष्ट्रातील 13 जिल्हयातील निवडलेल्या गावांचे रूप पालटणार अशी आशा वाटते.