चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा विजय

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

कोेल्हापूर -

ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावामध्ये शिवसेनेने विजय मिळवला

आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्र आले होते. मात्र तरीही शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे.

प्राथमिक कलानुसार शिवसेनेनं खानापूरमध्ये 6 जागांवर विजय मिळवला आहे. तीनही पक्ष एकत्र येऊनही शिवसेनेला विजय प्राप्त झाल्याने ही ग्रामपंचायत चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातच शिवसेनेनं विजय प्राप्त केल्यानं पाटलांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

कोल्हापूरमधील खानापूर ग्रामपंचायतीमधील ही अनोखी आघाडी सार्‍या राज्यात चर्चेत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उघडपणे या आघाडीवर नाजारी व्यक्त केली होती. मात्र या आघाडीवरही शिवसेने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मात करुन विजश्री भगव्याकडे खेचून आणली. या विजयाबरोबरच चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात म्हणजेच खानापूरमध्ये सत्तांतर घडलं आहे. सहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं सत्ता काबीज करत भाजपाला जोरदार धक्का दिलाय. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विरोधक असणार्‍या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला होता. तेव्हा सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विरोधकांनी टीका केल्याचे पहायला मिळालं होतं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com