ग्रामपंचायत निवडणूक : परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व

12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर विजय
ग्रामपंचायत निवडणूक : परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व

परळी -

एका तरुणीने बलात्काराचा आरोप केल्याने सध्या अड़चणीत सापडलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे ग्रामपंचायत निवडणुकीतील

वर्चस्व सिद्ध झाले आहे. परळी, अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती, त्यांपैकी 10 ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून उर्वरित 2 ठिकाणी संमिश्र निकाल आले आहेत.

परळी तालुक्यातील रेवली व वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या 3 अशा एकूण 5 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवड करण्यात धनंजय मुंडे यांना यश आलेले आहे.

त्यानंतर झालेल्या उर्वरित गावांमधील निवडणुकीत परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपूर या 4 गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत भाजपला राखण्यात यश आले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 5 पैकी मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून अंबलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोनही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपूर 7 पैकी 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.

दरम्यान, 12 ग्रामपंचायत निवडणुकीत 10 ग्रामपंचतींमध्ये एकहाती विजय मिळवत परळी मतदारसंघातील जनता धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे या निकालांवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

या सर्व विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात विजयी जल्लोष केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com