Gram Panchayat Election 2022 : राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; कार्यक्रम जाहीर

Gram Panchayat Election 2022 : राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; कार्यक्रम जाहीर

मुंबई | Mumbai

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

या निवडणुकांसंबंधीत नोटीस ही १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील. दरम्यान १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com