मुंबई पाऊस
मुंबई पाऊस
महाराष्ट्र

मुंबईत पावसामुळे शासकीय कार्यालयांना सुट्टी

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई | Mumbai

काल रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.

हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरूच राहणार आहेत

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला (Mumbai) अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे.

अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. यामुळे मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यलयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे. याआधी मुंबई महानगपर पालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com