ई-पास रद्द करण्यावर निर्णय होणार

पारदर्शक पध्दतीने ई पास देण्याची सुविधा
ई-पास रद्द करण्यावर निर्णय होणार

मुंबई

एसटीने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची अट रद्द केल्यानंतर राज्यभरातून खाजगी प्रवाश्यांनाही ही अट रद्द करण्यासाठी दबाव वाढल्याने राज्य सरकार याबात विचार करत आहे.

‘ई-पास’ बंद केल्यानंतर लोकांचा मुक्त संचार झाल्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढेल अशी भीती असल्याने सरकारला याबाबत निर्णय घेण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘ई-पास’ बाबत लोकांच्या अनेक तक्रारी असून याबाबत अनेक ठिकाणी मनमानी आणि भ्रष्ट्राचार सर्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल घेताना राज्य सरकार सुलभ आणि पारदर्शक पध्दतीने ई पास देण्याची सुविधा शक्यता आहे.

राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा सुरू करताना एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका जिल्हय़ातून दुसर्‍या जिल्ह्यात तुम्ही एसटी बसने विना ई पास जाऊ शकता. मात्र तुम्हाला खाजगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जायचे असेल तर ई पास अजूनही बंधनकारक आहे. एसटीने प्रवास करताना ई-पास नाही मग खाजगी वाहनाने प्रवास करणार्‍यांसाठीही ई पासची अट का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळेच आता ई पास बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्य नागरिकांना ई-पास मिळत नाही आणि एजंट मार्फत गेले तर लागेच ई पास मिळतो, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ई-पास चा मूळ उद्देश सफल होत नसून नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने हि ई-पास पद्धत पूर्णपणे बंद करावी, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. ई-पास बंद करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com