Gold Rate : जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

दसऱ्याच्या मुहूर्तावर एखादी वस्तू किंवा सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते
gold prices
gold prices

मुंबई | Mumbai

दसऱ्याच्या मुहूर्तावर एखादी वस्तू किंवा सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. तसेच या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. कालच्या दरापेक्षा आज सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झालेली दिसते.

आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ५० हजार २१० रुपये झाली आहे. काल (दि.२४) मुंबईतील २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१ हजार २०० इतकी होती. म्हणजे आज सोन्याच्या किंमतीत १० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच मुंबईत आज चांदी प्रति किलो ६२ हजार ५०० रुपये आहे. काल देखील चांदीची किंमत प्रति किलो ६२ हजार ५०० रुपये होती. येत्या काही महिने सोन्याचे भाव स्थिर राहतील. त्यात विशेष बदल होणार नाहीत, असा अंदाज सांगितला जात आहे. वर्षाच्या शेवटी मात्र भाव वाढू शकतात. डिसेंबरच्या अखेरीस सोन्यानं आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला असेल, असे मत सराफा बाजारातील व्यावसायिकांनी व्यक्त केले.

अमेरिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर तिथे अनेक घडामोडी घडत आहेत. त्याचा व्यावसायिक क्षेत्रावर परिणाम होत आहे. जगभरातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबत अद्यापही अनिश्तितता आहे. परिणामी सोन्याच्या किंमती सातत्याने उतरत आहेत. परदेश बाजाराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर नेहमी दिसून येत असतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com