पुणे गणेशोत्सव
पुणे गणेशोत्सव
महाराष्ट्र

गणेश मंडळांना आता हवे अनुदान

प्रशासन म्हणतं गणेशोत्सव मंदिरात साधेपणाने साजरा करा

Rajendra Patil Pune

पुणे

गणेशोत्सव जवळ येत आहे. करोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या सावटाखाली यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पुण्यातील गणेशोत्सवाचा भव्य स्वरूप आणि गणेश मंडळांचा उत्साह याला कोरोनामुळे प्रतिबंध बसणार आहे. अशातच आज पुणे महापालिकेत गणेश मंडळे, पोलीस आणि महापालिका प्रशासन यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पाडली. यंदा वर्गणी नाही, जाहिराती नाहीत त्यामुळे मंडळांना 10 बाय 10 चा मंडप टाकण्यासाठी 15 हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी मंडळांनी केली. तर , यंदा कोरोनच्या संकटामुळे गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, शक्यतो मंडई गणपती मंडळाने ठरविल्याप्रमाणे मंडळांनी मंदिरातच गणेशाची स्थापना करावी असे साकडे प्रशासनाने मंडळांना यावेळी घातले.

मानाचे 5 गणपती आणि दगडूशेठ, मंडई ,भाऊ रंगारी या आठ मंडळांनी यांनी तर एकत्र येऊन फर्गसन महाविद्यालयात अष्टविनायक कोविड केंद्र ही सुरू केले आहे. मात्र शहरात रजिस्टर 791 तर नोंदणी नसलेली 4000 अशी एकूण सुमारे 5000मंडळे आहेत

यंदा वर्गणी ,जाहिराती नाहीत त्यामुळं दहा बाय दहाचा मंडप टाकायला पालिकेने 15 हजार रुपये अर्थी मदत घ्यावी अशी।मागणी पुढे आली आहे.

आधीच पालिकेचे उत्पन्न घटले आहे त्यात जम्बो कोविड सेन्टर साठी 75कोटी लागणार आहेत. यामुळं आता कोरोना,लॉक डाऊन सोबत आलेलं आर्थिक अरिष्टही विघ्नहर्ता असलेला गणपती घालवेल आणि सुख समृद्धी आणेल अशी आशा सगळेच व्यक्त करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com